संस्थेची आगामी उद्दिष्ट्ये

news image

ग्रंथ आपल्या दारी

संस्थेत असलेला ग्रंथ संग्रह समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा त्याचा लाभ त्यांस व्हावा यासाठी संस्था “ ग्रंथ आपल्या दारी “ हा उपक्रम राबवू इच्छित आहे. यासाठी संस्था ग्रंथालयाचे संकेतस्थळ सुरू करणार आहे. याव्दारे सभासदांना घरबसल्या ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथांची माहिती मिळेल व त्यांस ग्रंथालयात न येताच ग्रंथांची मागणी नोंदविता येईल व सभासदांना घरपोच पुस्तकांची सुविधा उपलब्ध होईल.

news image

अभ्यासिका विकसित करणे

सध्या ग्रंथालयात अभ्यासिका विभागात 70 विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांकडून अभ्यासिकेत प्रवेश मिळण्यासाठी विचारणा होत आहे. परंतु अभ्यासिकेत अधिक आसनव्यवस्था नसल्याने नाईलाजास्तव नकार द्यावा लागत आहे. अभ्यासिकेचा अधिकाधिक मुलांना लाभ घेता / देता यावा यासाठी पुढील काळात 100-125 विद्यार्थ्यांस सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.

news image

इमारतीचे नुतनीकरण

संस्थेची इमारत आता जुनी झाली असल्यामुळे इमारतीचे नुतनीकरण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी सुमारे 20,00,000/- रू.खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात संस्थेचे सभासद व अंबरनाथच्या सुजाण नागरिकांकडून अर्थसाह्य मिळणे अपेक्षित आहे. इतर अर्थस्त्रोत उपलब्ध नसल्याने नूतनीकरणाचे काम नागिरकांच्या सहकार्यानेच पूर्ण होऊ शकते.