आमच्या विषयी
अंबरनाथमधील काही समाज व साहित्यप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १९४८ साली ग्रंथालय सुरू केले. सुरूवातीला एखाद्या सभासदाच्या खाजगी जागेत चालणाऱ्या मंडळाचा कारभार सन १९५८ मध्ये यशवंतराव प्रभाकर भुवन, प्लॉट क्र.३०, श्रीछत्रपती शिवाजी महाराज पथ, अंबरनाथ (पूर्व) या भाड्याच्या जागेत स्थलांतरित करण्यात आला.
सन १९५२ साली विम्को भागात १२ वाचक सभासद होते. परंतु १९५२ साली वाचकांची संख्या १२४ झाली. त्या वाचकांना ७५० पुस्तके व २३ प्रकारची मासिके वाचण्यासाठी उपलब्ध होती. त्याच सुमारास भारताचे थोर सुपुत्र व माजी अर्थमंत्री कै.चिंतामणराव देशमुख यांनी सपत्निक या संस्थेला भेट दिली.